Vighnaharta Mitra Mandal

श्री सार्वजनिक गणेशात्सव मंडळाचे यंदा ३३ वे वर्ष आहे. 'कार्यकर्ते म्हणून याचा आनंद आम्हालां नक्कीच होत आहे. पण त्याही पेक्षा या ३३ व्या वर्षी आनंदाचे खरे मानकरी रहिवाशी ' बंधुभगिनी, व्यापारीवर्ग, देणगीदार व हितचिंतक हेच आहेत असे आम्ही मानतो.

१९९१.९२ साली, श्रीं ची स्थापना करुन या उत्सवाची मुहूर्त मेढ रोवली आणि तिथूनच या मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्याची सुध्दा सुरुवात झाली. रस्त्यांची व्यवस्था, वृक्षांची लागवड, विविध धार्मिक, सामाजिक व क्रीडात्मक उत्सव, सांस्कृतिक व शैक्षणिक स्पर्धात्मक उपक्रम, वैदयकिय शिबिरे, गृहनिर्माण संस्थांच्या विविध समस्यांचे निराकरण विभागातील गुन्हेगारीला पोलिसांच्या सहकार्याने आळा, इत्यादी, अनेक कार्ये मंडळाने सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून आजपर्यत यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत.

मंडळाची कार्यपध्दती ही सुशिक्षित व सुसंस्कृत स्वरुपाची अशी आहे. मंडळाने भारतावर होत असलेल्या सामाजिक आक्रमणांचा उहापोह नेहमीच आपल्या गणेशोत्सवाच्या देखाव्यांमधून केला आहे त्यामध्ये शिक्षण, जागतिकीकरणाचे चांगले वाईट परिणाम, जागतिक तापमानवाढ (ग्लोबल वॉर्मिंग), पाण्याचे अनन्यसाधारण महत्य व उपाय, शिक्षणाचे महत्य, झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एस.आर.ए), ईको फ्रेन्डंली गणेशोत्सव, दत्तक घेणे वीर सावरकर प्रकाश वाटा (डॉक्टर :- प्रकाश बाबा आमटे) इत्यादी विषयांचा आलेख प्रभावीपणे लोकांसमोर ठेवला व लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असा गणेशोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न नेहमीच केला आहे. आपल्या मंडळाचे वैशिष्ठ म्हणजे गणेशाची मूर्ती आजपर्यतच्या प्रवासामध्ये आपण मोरपिसांपासून, मोत्यांपासून, नारळीच्या किशीपासून, फॉईल पेपरापासून अशा प्रकारच्या नौसर्गिक साधनांचा उपयोग करुन मूर्ती सजवलेली होती. नैसर्गिक जवाबदारी ओळखून मंडळाने मागच्या ८ वर्षापासून ईको फ्रेन्डली मूर्ती बनविण्याचा विडा उचलला आणि येणा-या वर्षीमध्येसुध्दा असाच प्रयत्न चालू राहील.

Shree Jivdani Devi Sansthan Virar East

गगनाला गवसणी घालणा-या गरुडपक्षासारखी भरारी ३३ व्या वर्षामपर्यंत ' मारुन संपूर्ण मुंबापुरीत आपला वेगळा ठसा गणेश दर्शन स्पर्धेद्वारे गेली ३० वर्ष 'उमटविला आहे.

ज्यांनी आर्दश घालून दिला त्या संस्थापक ज्येष्ठश्रेष्ठ कार्यकत्र्याचे हे मंडळ प्रथमतः आभारी आहे. मंडळाच्या कार्यात सहकार्य करणारे बृहन्मुंबई महानगर पालिका, बोरीवली पोलीस ठाणे यांचे सहकार्य मिळाल्यामुळेच उत्सव निर्विघ्नपणे पार पडला. ३३ वर्षे यशस्वीरित्या व उत्तमप्रकारे साजरे करण्याकरिता सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन शेवटी आम्ही रहिवाशाना करीत आहोत व चंपाभुवन च्या विघ्नहर्ताचे आजपर्यंत आपणासर्वांकडून जशी सेवा करुन घेतली तशीच मनोभावे सेवा यापुढेही करून घ्यावी अशी प्रार्थना श्री गणेश चरणी करुन ही प्रस्तावना पूर्ण करीत आहे.

बोला, गणपती बाप्पा मोरया...! हि शान कोणाची, चंपाभुनच्या विघ्नहर्ताची..!

Award & Achievement

Contact

  • +91 9967017625
  • avinashmore13079@gmail.com
  • Vighnaharta Rahivashi Mitra Mandal Champabhuvan Near Borivali Station Borivali(East).
×